About Us

इतिहास

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. ही मुंबई जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त सहकारी संस्थांची केंद्रीय वित्तीय संस्था आहे.ही बँक ‘मुंबई बँक’ या नावाने ओळखली जाते.१९७४ साली एमसीएस अधिनियमांतर्गत या बँकेचे नोंदणीकरण करण्यात आले आणि १२ फेब्रुवारी १९७५ पासून या बँकेचे कार्य सुरु झाले. या जिल्ह्यात कृषी उत्पादन नसल्यामुळे मुंबई बँक बिगर-कृषी सहकारी संस्थां जसे की, शहरी सहकारी बँका, शहरी सहकारी क्रेडिट सोसायटीज, कर्मचारी सहकारी क्रेडिट सहकारी सोसायटीज, सहकारी ग्राहक स्टोअर, औद्योगिक, मत्स्य आणि कामगार सहकारी सोसायटीज इत्यादींच्या अर्थविषयक गरजा पुरविते.

भारतामध्ये सहकारी चळवळींद्वारे जी धोरणे सुरु करण्यात आली आहेत, त्यांचा उद्देश आहे, की “देशाची प्रगती, गरीबांचा विकास आणि देशातील सामाजिक-सांस्कृतिक विचारांच्या तत्वांचा प्रसार करणे.” सहकार चळवळीने आपल्या देशाला आर्थिक विकास करण्यास आणि मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी सक्षम बनवले आहे. जलदगतीने बदलणाऱ्या आजच्या उदारमतवादी आर्थिक युगामध्ये सहकारी तत्त्वांचे यश, हे त्यांच्या समोर येणाऱ्या समस्यांना प्रगती आणि विकासाच्या सुवर्णसंधीमध्ये रूपांतरित करण्यावर अवलंबून असते. भारतीय सहकारी चळवळ आजतागायत जगातील सर्वात मोठी चळवळ आहे. भारतीय सहकारी संस्था जवळजवळ सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, जसे की शेती, कृषी प्रक्रिया, खते, विपणन, क्रेडिट, डेअरी, कापणी, हातमाग आणि हस्तशिल्प, साखर, मत्स्य, बँकिंग इत्यादी.

भारतात सहकारी संस्थांनी खूप प्रसिद्धी मिळविली, कारण या संस्थांनी खोलवर रुजण्याची आणि संस्थांवर सशक्त विश्वास ठेवण्याची क्षमता सिद्ध केली आहे.काही सहकारी संस्थांचे कार्य करण्याचे क्षेत्र गाव, तालुका, जिल्हा, राज्य किंवा संपूर्ण भारतभर मर्यादित आहे.सहकारी संस्थांमध्ये संगणकीकरणाची नवीन गरज निर्माण झाली आहे. यशस्वी व्यावसायिक संस्था निर्माण करण्यासाठी कार्यकारी क्षमता, ग्राहक सेवा, पत्रव्यवहार आणि व्यवस्थापकीय माहिती पद्धती हे चार महत्त्वाचे घटक आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडद्वारे हे घटक संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सुधारण्यात आले. या सहकारी संस्था स्वयंसेवी, स्व-जबाबदारी, लोकशाही, समानता, न्याय समता आणि एकता या मुल्यांवर आधारित आहेत. सहकारी तत्वे ही सहकारी संस्थांची मूल्ये अभ्यासण्याची मार्गदर्शक तत्वे आहेत. मँचेस्टरमध्ये सप्टेंबर १९९५ मध्ये आयोजित केलेल्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स (आयसीए- आंतरराष्ट्रीय सहकारी गठबंधन) संमेलनात सहकाराची सात मूळ तत्वे मंजूर करुन स्वीकारण्यात आली.

  • स्वयंसेवी आणि मुक्त सदस्यत्व
  • लोकशाही सदस्य नियंत्रण
  • सदस्य आर्थिक सहभाग आणि नियंत्रण
  • स्वायतत्ता आणि स्वातंत्र्य
  • शिक्षण, प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान
  • सहभागातून सहकार्य
  • सामाजिक जाणीव

सहकारी संस्था म्हणजे व्यक्तींनी एकत्रित येऊन त्यांच्या सामान्य आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि लोकशाहीचे नियंत्रण असणारी सयुंक्तपणे निर्माण केलेली संस्था होय. महाराष्ट्र राज्यात त्रिस्तरीय सहकारी पत संस्थेची संरचना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्य पातळीवर काम करणारी सर्वोच्च संस्था आहे, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर काम करणारी संस्था आहे. या बँका शेती तसेच बिगर शेती सहकारी क्षेत्रांमध्ये सदस्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविण्याची महत्त्वाची भूमिका निभावतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था देखील जिल्ह्यातील सर्व प्रमुख सहकारी संस्थांना अधिकतर निधी देऊन केंद्रीय समतोल राखण्याचे काम करतात.

आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी सर्व सहकारी संस्था आणि महामंडळांना आवाहन करतो, की त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या बँकेकडून आर्थिक सहाय्य घ्यावे.


MDCC Logo